इंग्रज भारतातून गेल्यावरही भारतीयांनी इंग्रजी भाषेला आपलेसे केले; आता तर ती ज्ञानभाषा आहे. पण मुळात व्यवहारात ही भाषा उपयोगात नसल्याने बहुतांश शिक्षकांना इंग्रजी भाषा शिकवणे हे एक आव्हान वाटते. या पुस्तकात शिक्षकांनी आदर्श पद्धतीने इंग्रजी कसे शिकवावे यासाठी काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. यात शिक्षकांचे बोली व लेखी इंग्रजी, उच्चारशास्त्रासंबंधीची चर्चा, शैक्षणिक साधने, परीक्षा इ.चा समावेश आहे. यातून शिक्षकांना माहिती नसलेल्या; पण आवश्यक अशा अनेक गोष्टींची माहिती मिळवता येईल. इंग्रजी भाषेचा उत्तम शिक्षक व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे पुस्तक.