विभक्त कुटुंबपद्धतीमुळे एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांची माहिती आणि अनुभव यापासून वंचित असल्याकारणाने त्यांना योग्य आणि समर्पक मार्गदर्शनाची आज गरज आहे. परंपरागत चालत आलेल्या रूढींचा पगडा आणि चुकीचे समज नवीन पालकांना जास्तच गोंध्ंळात टाकतात. या पुस्तकात दिलेल्या उपयुक्त माहितीद्वारे पालकांच्या ज्ञानातील त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त निरोगी बालक असा दृष्टिकोन न ठेवता मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे फुलवावे याचे योग्य मार्गदर्शन करून डॉक्टरांनी मुलांच्या वाढीबाबातचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
– डॉ. वाय. के. आमडेकरMD DCH FRCPCH
केवळ शारीरिक वाढीवर टिपन न करता मुलांचा मानसिक विकास आणि सर्वांगिण वाढ कशी होईल, याकडेही डॉ. संजय जानवळेंनी लक्ष दिले आहे. पुस्तकाला एक गतिमानता लाभलेली आहे; कारण प्रसूतिपूर्व काळापासून सुरुवात करून डॉक्टरांनी मुलाला आणि त्याच्या पालकांना शाळेपर्यंत नेऊन सोडले आहे. साधी भाषा, कठीण शास्त्रीय विषयही सोप्या शब्दात समाजावून सांगण्याची डॉक्टरांची हातोटी, उत्तम निर्मितीमूल्ये यामुळे हे पुस्तक संग्राह्य झाले आहे आणि ते वाचकाला आणि आणि पालकाला आणि पालकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल असा विश्वास आहे.
– डॉ. संजय ओक,कुलगुरू, पद्मश्री डॉ. डी. वाय. विद्यापीठ,नेरूर, नवी मुंबई.