धार्मिक मूलतत्त्ववादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात ‘द गुड मुस्लिम’ची कथा आकार घेते. सोहेलच्या जीवनात एक बलात्कारपीडित महिला येते आणि अचानक गायब होते. त्याची डॉक्टर बहीण माया युद्धपीडित महिलांवर उपचार करत असते. जेव्हा दशकभरानंतर ती घरी परतते तेव्हा सोहेल त्याच्या क्रांतिकारक आदर्शांपासून दूर गेल्याचे तिच्या लक्षात येते. युद्धात नवरा मारला गेलेल्या सिल्व्हीशी त्याने केलेला विवाह, तिच्या धार्मिक गोष्टींचा सोहेलवर पडलेला प्रभाव, तिच्यापासून झालेल्या सोहेलच्या झैदी या छोट्या मुलावरही कडव्या धर्मांधतेचा असलेला अंमल, सिल्व्हीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर सोहेलचा झैदला मदरसामध्ये पाठवण्याचा निर्णय, यातून बहीण-भावामध्ये उभा राहतो संघर्ष, त्यात मायाच्या आईला झालेला कॅन्सर. जॉय हा सोहेलचा मित्र मायाशी लग्न करू इच्छितो. या सगळ्या परिस्थितीत माया जॉयशी लग्न करते का? झैदचं काय होतं? युद्धाच्या पार्श्वभूमीवरील एक जबरदस्त कादंबरी.