Skip to product information
1 of 1

Aabut Gheryatla Sury by Arun Ingawale

Description

अरुण इंगवले यांचा हा दुसरा कविता संग्रह. 'आबूट घेऱ्यातला सूर्य ' या संग्रहातील प्रत्येक कविता धीटपणे काही तरी बोलू पाहाते आहे . आजच्या समाजावर, तीमधील वास्तवावर भाष्य करू पाहाते आहे . या वास्तवामधील विपरीतपण उजागर करू पाहाते आहे . अवतीभवतीच्या घटना , परिस्थिती , मानवी वर्तन , विसंगती , दंभ अशा अनेक गोष्टीचे निरीक्षण अरुण इंगवले यांच्या कवितेत सूक्ष्मपणे येते. कालपटाबद्दल एक  प्रगल्भ जाण आणि प्रखर संवेदनशीलता ही या कवितेची बलस्थान आहेत. वाचकाला अस्वस्थ करण्याबरोबरच अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य या कवितेत आहे. 'आबूट' हा शब्द कोकणात धुक्यासाठी वापरला जातो .  'आबूट घेऱ्यातला सूर्य ' या शीर्षकातून कवीला नकळतपणे एक  आशावाद मांडायचा आहे. धुक्याचं हे घेरणं  काही काळापुरत आहे.  अखेर सूर्य नावाचं शाश्वत सत्य तेजाने तळपणारच आहे . 
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Aabut Gheryatla Sury by Arun Ingawale
Aabut Gheryatla Sury by Arun Ingawale

Recently viewed product

You may also like