क्लॅन्टन, मिसिसिपी, दोन दारूड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक बहुसंख्येने असणा-या शहरातल्या लोकांना या भयानक घटनेमुळे मोठाच धक्का बसतो. मग त्या मुलीचा कृष्णवर्णीय पिता अॅसॉल्ट रायफल मिळवतो आणि त्या पाशवी गुन्हेगारांना ठार मारतो. पण हे मिसिसिपी राज्य असते. घृणास्पद अत्याचार करणारे गोरे लोक कितीही नादान असले तरी एका काळ्या माणसाने त्यांचा खून करणे तिथे मान्य होत नाही. पुढले दहा दिवस कु क्लस क्लान, जळते व्रूÂस, खून, धाकदपटशा, स्नायपर रायफल्स या गोष्टी क्लॅन्टनच्या रस्त्यांवर जबरदस्त दहशत निर्माण करतात. स्वत:च्या अशिलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला बचाव पक्षाचा तरुण अॅटर्नी ब्रिगॅन्स याला स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवायचीही धडपड करायला लागते.