Skip to product information
1 of 1

A Note From Ichiyo By Rei Kimura

Description

अठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी, पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको, एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पाय-या भरभर चढत जाऊन अत्युच्च पायरीवर- सामुराई पदावर पोहोचण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या नोरीयोशी हिगुचीची मधली मुलगी. सामाजिक परंपरेनुसार अत्यंत दुय्यम स्थान असलेली; पण तीव्र बुद्धी व साहित्यिक जाण यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी, साहित्यप्रेमी पित्याचा ती जीव की प्राण होती. एके दिवशी अस्खलित काव्यवाचन करताना या चिमुरडीच्या मनावर त्या लिखित शब्दांनी गारूड केलं. शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणा-या साहित्यप्रेमाचा, शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणा-या नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं. सभेतील टाळ्यांच्या कडकडाटानं नोरीयोशी अभिमानानं फुलून आला; पण लग्न, चूल, मूल आणि घर हेच स्त्रीचं आयुष्य मानणा-या समाजात आपल्या या वाचनवेड्या, साहित्यप्रेमी लेकीचं काय होईल, या विचारानं आई पुरुयाचं काळीज दडपलं गेलं. पुढील आयुष्यात नत्सुकोचं व तिच्या पित्याचं स्वप्न खरं झालं की, आईची काळजी... “A Note from Ichiyo” tells the turbulent life, struggles and achievements of Ichiyo Higuchi, a young Japanese female writer of extraordinary talent and the tongue in cheek ability to effortlessly cut through all the rigid constraints of being a woman in a man’s world who ended up having the world, including some of the most prominent male writers, at her feet -- grudgingly so but still at her feet!
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
A Note From Ichiyo By Rei Kimura
A Note From Ichiyo By Rei Kimura

Recently viewed product

You may also like