श्री. वागळे यांच्या पोलीस जीवनात घडलेल्या अनेक सत्यकथापैकी काही सत्यकथा या पुस्तकात आहेत. या सर्व कथा वाचनीय आहेतच पण त्याचबरोबर वाचकाला त्या कथा एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात आणि माणुसकी असलेला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी जनतेचा मित्र असतो याची खात्री पटवून देतात. "अखेरचा सवाल' या कथेत श्री. वागळे माणूस म्हणून किती श्रेष्ठ दर्जाचे आहेत हे स्पष्ट दिसते. मनुष्य स्वभाव कसा विचित्र आहे याचे चित्र, असाही एक दरोडा' या कथेत रेखाटले आहे. "विचित्र सौदा' ही कथा वाचताना वाचकाचे मन हेलावतेच पण त्याचबरोबर तो अंतर्मुखही होतो. या सर्व कथा श्री. वागळे यांची धाडसी व निर्भय वृत्ती व त्यांच्यातील असलेली माणुसकी स्पष्ट करतात.