जयवंत हापन जयवंत हापन हे कवी मनाचे लेखक आहेत. त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त आहे. त्यांची लेखनशैली ललित व रंजक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून ते सकारात्मक, काव्यात्मक विचार वाचकांना देतात. ते थेटपणे एक एक विषय मांडतात. तो वाचकाला लगेच कळतो. कुठेही गुढता, क्लीष्टता नसल्याने हे लेख थेट मनाला भिडतात. या लेखांमधील विविध विचार कधी अंतर्मुख करतात तर कधी आनंदीत करतात. कधी वैचारिक वेगळीच दिशा देतात. त्यामुळे हे सर्व लेख रसिकांना तर आवडतीलच पण बुद्धिवंतांनाही विचार करावासा वाटेल असे आहेत. हवेहवेसे वाटत असतानाच लेख संपतो त्यामुळे विचारांचे हे नवनीत वाचकांना सुख संवेदना देते.