विनोदी कथालेखक म्हणून सुपरिचित असलेले भा. ल. महाबळ स्त्रीपुरूष यांची मानसिक अवस्था शब्दात अचूकपणे पकडून कथा रंजक तर बनवतातच, त्याच बरोबर या कथा मानवी जीवनातील वेगवेगळे अनुभव समर्थपणे मांडतात, महाबळ हे केवळ विनोदी कथाच लिहितात हा समज या कथा संग्रहामुळे मागे पडेल.