हे पुस्तक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून प्राणायाम या शास्त्रावर व श्वसन नियंत्रणाच्या कौशल्यावर प्रकाश टाकतं. प्राणायामाचा उगम, प्राणायामाशी संबंधित समज-गैरसमज, आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यापासून होणारे फायदे याची चर्चा या पुस्तकात केली आहे. नव्यानेच प्राणायामाला सुरुवात करणार्यांनाही हे पुस्तक विशेष मार्गदर्शन करतं. या पुस्तकाची वैशिष्टये आहेत.... 0 प्राणायामाशी निगडित विविध आसनांची ६० छायाचित्रं 0 छायाचित्रांसोबत आसनांचं समर्पक विवेचन 0 प्राणायामाचे विविध प्रकार आणि बंध, क्रिया व मुद्रा यांचीही माहिती 0 रोग निवारणासाठी उपयुक्त आसनं 0 पाठदुखी 0 मधुमेह 0 दमा 0 पचनाच्या तक्रारी 0 मूळव्याध 0 स्थूलपणा 0 संधिवात 0 गाऊट असे अनेक आजार विशिष्ट आसनं करून बरे होऊ शकतात किंवा एका विशिष्ट पातळीपर्यंत त्यांची तीव्रता कमी करता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात फक्त काही मिनिटं नियमितपणे प्राणायाम करा आणि ताण-तणाव व व्याधींना दूर ठेवा.