आज शहरी जीवनात अनारोग्याचे प्राबल्य आढळते. वातावरणातील प्रदूषण, आर्थिक सुबत्तेकरता धावपळ, प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा ,यामुळे विद्यार्थी ,प्रौढ, वृद्ध ,सर्वांनाच काही ना काही आरोग्य तक्रारींना सामोरे लागते. शहरांत अद्ययावत चीकीत्सालायांना तोटा नसूनही सामान्य जीव आपल्या प्रकृती संबंधात असमाधानी दिसतो. पहिले सुख निरोगी असण्यात आहे. माणसाच्या वासनेला मर्यादा नसतात, त्यामुळे तृप्ती मिळत नाही. दु:ख भोगावे लागते .म्हणून वासनेचा त्याग करावा लागतो. सामर्थ्य ' योग साधनेत ' निश्चितच आहे .
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने गेल्या पंचवीस वर्षातील अभ्यास ' योगोपचार ' क्षेत्रात केलेला अभ्यास आणि आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक लिहिले आहे.