स्त्रियांसाठी योगासने ही पुरुषांसाठी करण्याच्या योगासनांपेक्षा फार वेगळी नाहीत. मुले, संसार, जेवणखाण इत्यादी सांभाळून कामावर जाणाऱ्या स्त्रियांना एकावेळी 40 मिनिटे एवढा मोकळा वेळ मिळणे कठीण असते. कामाच्या जागेवर, प्रवास करताना, घरात बसल्या बसल्या योगासनातील स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण, स्नायू व बंध यांना मिळणारे तणाव, श्वसनाकडे लक्ष दिल्याने होणारा एकाग्रतेचा सराव, पाठीच्या, मानेच्या, खुब्याच्या स्नायूचा 'टोन' वाढवणे या हेतूने सर्व स्त्रिया साधी आसने दिवसभर करू शकतात. अशा प्रकारे आपली निरामयता कमावू शकतात, टिकवू शकतात, अशी योगासने हे प्रत्येक स्त्रीला एक वरदानच आहे. -- डॉ. ह. वि. सरदेसाई