मराठी रंगभूमीची अविस्मरणीय सफर म्हणजे ‘वंग-चित्रे’. शांतिनिकेतन येथील वास्तव्यात पु. ल. देशपांडे यांच्या मनावर उमटलेली रवींद्रनाथ टागोर यांची विलक्षणता ‘वंग-चित्रे’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केली आहे, जी अतिशय सुंदर स्वप्नांप्रमाणे भासतात. पु. ल. म्हणतात, ‘‘१९७० साली बंगाली भाषेशी सलगी करावी म्हणून मी शांतिनिकेतनात गेलो. तिथल्या माझ्या वास्तव्यात मनावर उमटलेली ही वंग चित्रे.’’‘वंग-चित्रे’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाली शिकण्यासाठी थेट शांतिनिकेतन गाठणारे, रवींद्रनाथ टागोरांवर अपार श्रद्धा असणारे पु. ल. आपल्या डोळ्यांसमोर त्या वेळचे शांतिनिकेतन उभे करतात, मात्र या पुस्तकाचे स्वरूप केवळ पु. लं. चा बंगाली शिकण्याचा अनुभव इतकेच मर्यादित नाही, तर त्यात तत्कालीन बंगाली समाजजीवनाचा आरसाही पहायला मिळतो.