पिढ्यान्पिढ्या सांभाळलेली, जन्मोजन्मीचं नातं असलेली जमीन… शेतकर्याच्या काळजाचा तुकडा, पोटच्या लेकराप्रमाणं सांभाळलेला, त्याला जीव लावलेला.तोच काळजाचा तुकडा क्रूर नियतीनं कापला, हिसकावला, ओरबाडला, रक्तबंबाळ केला, तर होणार्या भयंकर यातना सोसणार्यालाच माहीत. याच यातना प्रकल्पग्रस्तांनी भोगल्या.आपलं घरटं अन् जमीन आपल्या डोळ्यांदेखत कोणीतरी उद्ध्वस्त करावी… उद्ध्वस्त घर आणि चिरफाड जमिनीकडे हताशपणे पाहण्याशिवाय असहाय जीव काहीच करू शकत नाही; तो तळमळतो, तडफडतो. अखेरच्या श्वासापर्यंत व्यवस्थेशी संघर्ष करतो. अशाच एका प्रकल्पग्रस्ताचा काळजाला भिडणारा ज्वलंत प्रश्न… वाळवाण.