डॉ. सदानंद नाडकर्णी यांच्या चिंतनपर लेखांचा हा संग्रह. समाजवादी विचारांच्या डॉ. नाडकर्णी यांनी प्रस्तुत पुस्तकात विविध विषयांवर आपली परखड मते व्यक्त केली आहेत. समाजातील कांही प्रश्न आणि त्यावर उपाययोजनाही सांगितल्या आहेत. प्रगत, निरोगी समाजवादाची वाट आता अवघड आहे; हे त्यांना मान्य आहे. तथापि त्यांची दिशा स्पष्ट आहे आणि निदानपक्षी प्रत्येकाच्या जीवनक्रमाला एक अर्थ प्राप्त होईल, असे डॉ. नाडकर्णी यांना वाटते. समतोल व आर्थिक विकासाच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेले विचार वाचकांना अंतर्मुख करतील व पथदर्शकही ठरतील, हे नक्की.