तथाकथित सुरक्षेच्या नावाखाली जगण्याच्या विविध क्षेत्रांमध्ये काही ‘निषिद्ध क्षेत्रे’ घोषित केली जातात.
या निषिद्ध क्षेत्रांच्या बेटांवर राहणारे राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली काय काय प्रकारची गुलामगिरी, कोण-कोणत्या प्रकारचे अत्याचार, अपमान सहन करत असतात, हे ह्या कादंबरीतील व्यक्तिरेखांद्वारे
मोठ्या कौशल्याने प्रत्ययास आणून दिले आहे.
भ्रष्टाचाराने आपल्या समाजाचा झालेला कुरूप चेहरा दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
समाजातील दुःखांचा वेध घेणारी ही कादंबरी समाजव्यवस्था आणि परिवर्तनाच्या त्रुटींवर बोट ठेवते. आजचे वास्तव यात प्रकट होत असल्याने ही कादंबरी वाचकांना नक्कीच आवडेल आणि अंतर्मुखही करायला लावेल.