हा लेखसंग्रह ‘क्रिटिकली युवर्स’ अशा धाटणीचा आहे. ‘आपला नम्र’ किंवा ‘आपला विश्वासू’ अशी तात्पुरती गरजू भूमिका तो घेत नाही. जे पटत नाही, आवडत नाही ते लेखकाने स्पष्टपणे सांगितले आहे. रोखठोकपणातील कठोर भाव वगळूनही खूप गोष्टी ठासून मांडता येतात, त्याचा हे लेखन एक नमुना आहे. महाराष्ट्र सध्या विसंगती, विरोधाभास यात जगू लागला आहे. त्याला कळेनासे झाले आहे की, आपले जगणे भलतेच अभावग्रस्त होऊ लागले आहे. मूल्यांचा अभाव, नीतीचा अभाव, ठोसपणाचा अभाव, सातत्याचा अभाव यावर या लेखांचा रोख आहे. लेखक जयदेव डोळे हे पत्रकारिता करून अध्यापनाकडे वळलेले एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व. प्रसिद्धिमाध्यमांची चिकित्सा करणारी त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.