वैज्ञानिक शोध हे नेहमी भव्यदिव्य आणि एकदम नवीन असतात, असे नसते. अनेक वेळा अनुभवजन्य ज्ञानातून होणारी प्रगती आणि पुढे होणाऱ्या प्रगतीचं ते एक पाऊल असतं. हे सारं विज्ञान रंजकतेने मांडलं, तर अधिकाधिक माहिती मिळविण्याची ओढ निर्माण होते. विद्यार्थी आणि सामान्य वाचकांच्या मनात विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी यासाठी वैज्ञानिक माहिती रंजक स्वरूपात इथे दिली आहे. एरवी क्लिष्ट वाटणारे वैज्ञानिक संशोधन आणि शोधाची माहिती रंजक स्वरूपात दिल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान समजून घेणे सोपे करणारे पुस्तक. हे रंजक विज्ञान मनोरंजन करतानाच आपल्याला किती उपयुक्त माहिती देते ते शोधण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.