विज्ञानाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती? असा प्रश्न उद्भवल्यास विज्ञानातील निरनिराळे शोध हीच ती देणगी होय. एखादा शोध किंवा शोधांची मालिका या देणगीपेक्षा विज्ञानाने मानवाला एक अमर आणि सर्वोत्कृष्ट अशी देणगी दिलेली आहे. ती म्हणजे ‘शास्त्रीय विचारसरणी’ निरीक्षण, मापन, प्रयोग आणि तर्कशुद्ध विचार हेच या शास्त्रीय विचारसरणीचे प्रधान घटक आहेत. राष्ट्राच्या अभ्युद्याला ही शास्त्रीय विचारसरणीच कारणीभूत होत असते. विज्ञानाचे वाचन आणि ते समजावून घेण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे ‘संस्कृतिसंवर्धन’ हा आहे. तो साध्य होण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.