मलिका-ए-हिंदुस्थान या किताबाने सुखावणारी, कोहिनूर हिरा अभिमानाने अंगावर मिरवणारी राणी व्हिक्टोरिया तिचे हिंदुस्थानी साम्राज्य कधीच बघू शकली नाही. म्हणून तिने आपल्या प्रासादातच छोटा हिंदुस्थान उभा केला. दिमतीला हिंदुस्थानी सेवक ठेवले. राजप्रासादात रोज सकाळी मोगलाई भोजन बनवण्याची प्रथा पाडली आणि स्वत: अब्दुलकडून उर्दू शिकण्यास सुरूवात केली. कोण होता हा अब्दुल ? राणीच्या सेवेत खिदमतगार म्हणून रूजू झालेला आग्य्राचा हा अल्पशिक्षित युवक तिचा उर्दूचा गुरू, तिच्या पत्रव्यवहारात लक्ष घालणारा मुन्शी आणि तिचा हिंदुस्थानविषयक सल्लागार कसा काय बनला ? पृथ्वीच्या एकपंचमांश भूभागावर राज्य करणारी सम्राज्ञी आणि तिचा एक मामुली खिदमतगार यांच्यामधील नात्याची ही अजब कहाणी