न्याय-अन्यायाची व्याख्या कशी करायची?स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं उलटून गेल्यावरही भारताच्या खात्यात काय जमा झाले? सगळीकडे अंधाराचे साम्राज्य असताना आपल्यातील चांगुलपणाचा, सद्सद्विवेक बुद्धीचा दीप कसा तेवत ठेवायचा?खरा शिक्षक कसा असतो? पालकत्व पेलवतानाची तारेवरची कसरत कशी पार पाडायची? उच्च शिक्षणातील सावळ्या गोंधळाला जबाबदार कोण? मुलांच्या अभ्यासक्रमाची निवड कशी करावी?हे प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात. या पुस्तकात लेखकाने अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर सखोल चिंतन करून त्यांना अतिशय संवेदनशीलतेने आणि जागरुकतेने पर्याय शोधले आहेत.त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आपलेसे वाटेल यात शंकाच नाही. विचारप्रवृत्त करणारे, आपल्या सामाजिक जाणीवांना धार लावणारे, वाचकाला अंतर्मुख करणारे पुस्तक.