या पुस्तकामधील सर्व लेख विज्ञान हा अभ्यासाचा विषय नसलेल्या परंतु सुशिक्षित अशा सामान्यजनांसाठी लिहिले असले तरी विज्ञान याविषयी कुतूहल असणार्यांना व विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.
आजच्या विज्ञानप्रधान संस्कृतीमध्ये जीवनाच्या अनेकाविध प्रश्नांकडे शास्त्रीय दृष्टीने पाहण्याची बुद्धी सर्वांना व्हावी व ज्ञाननिष्ठ विचारसरणी त्यांनी आत्मसात करावी,
हा या पुस्तकाचा हेतू आहे.
डॉ. आनंद दामले हे विज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी वेळोवेळी, प्रसंगानुरूप लिहिलेले हे विज्ञान लेख
आपली विज्ञाननिष्ठा वाढविणारे व प्रेरणा देणारे आहेत.