पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट ० आमटी ० डाळी ० पालेभाजी ० पिठले ० कडधान्यं ० कढी ० सांबार आणि ० गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.