उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Vangmayvimarsha by Arun Prabhune

Description

वाङ्मयविमर्श या ग्रंथात समकालीन साहित्यव्यवहार आणि अध्ययनव्यवहार यांतील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नेमके दिग्दर्शन करणारे लेखन अंतर्भूत केले आहे. डॉ. अरुण प्रभुणे यांच्या गौरवार्थ सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे वेगळे वैशिष्टय असे की, महाराष्ट्रातील अभ्यासकांप्रमाणेच अमेरिकेतील अभ्यासकांचेही लेख त्यात समाविष्ट झाले आहेत. परदेशातील या विद्वानांनी डॉ. प्रभुणे यांच्याविषयी वाटणार्‍या सद्भावनेपोटी हे लेख नव्याने लिहून अतिशय आत्मीयतेने पाठविले आहेत. देशी व विदेशी लेखकांनी एकत्र सिद्ध केलेला हा मराठीतील पहिलाच गौरवग्रंथ असेल. एकंदरीत, वाचकांच्या बुद्धीला चालना मिळावी, अभ्यासकांच्या संशोधकवृत्तीला धुमारे फुटावेत आणि समीक्षकांमध्ये नव्या आव्हानांना तोंड देण्याची ईर्षा निर्माण व्हावी; असे प्रेरणादायी लेखन प्रस्तुत ग्रंथात आहे. त्यामुळे मराठीप्रेमी वाचक या ग्रंथाचे आस्थापूर्वक स्वागत करतील आणि मराठीचे अभ्यासक या ग्रंथाकडे एक संदर्भग्रंथ म्हणून पुनः पुन्हा वळतील.
नियमित किंमत
Rs. 324.00
नियमित किंमत
Rs. 360.00
विक्री किंमत
Rs. 324.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Vangmayvimarsha by Arun Prabhune
Vangmayvimarsha by Arun Prabhune

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल