प्राचीन अलास्कामध्ये विविध भाषा बोलल्या जात होत्या. आज त्या भाषा अस्तित्वाच्या संघर्षात आहेत. मूळ अलास्कन लोकांच्या भाषांतील अनेक कथा मौखिक परंपरेतून आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत. ह्या भाषांतील कथा पुराणकथा, दंतकथा किंवा अख्यायिकांच्या स्वरूपात आहेत. मिथाकांचा मागोवा घेणाऱ्या आहेत.
अशा कथांचा अभ्यास हा डॉ. स्मेल्सर यांचा ध्यास व अभ्यासविषय बनला. त्यांनी त्या संकलित केल्या आणि भाषांतरित केल्या. अलास्कन समाजाच्या रूढी, परंपरा, दैवत, श्रद्धा अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी ह्या कथांचा अभ्यास महत्वपूर्ण आहे.
तौलनिक आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासाची सोयया या कथांच्या अनुवादांमुळे झाली आहे. मराठीत प्रथमच अलास्कन लोककथा अनुवादित होत आहेत.
सौ. उषा प्रभुणे व डॉ. अरुण प्रभुणे यांनी केलेल्या अनुवादाचे वेगळेपण असे आहे की, त्यांनी डॉ. स्मेल्सर यांचाशी प्रत्यक्ष चर्चा केल्या, त्यांची मुलाखत घेतली, मूळ लेखक समजून घेतला. ह्या वेगळेपणामुळे हा अनुवाद अधिक नैसर्गिक आणि मौलिक झाला आहे.