‘उस्मानाबाद’ हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील दुष्काळी जिल्हा. ह्या जिल्ह्यात दैवतांची श्रीमंती आहे. श्रीतुळजाभवानीपासून येडेश्वरीपर्यंत आणि काळभैरवापासून खंडोबापर्यंत अशा अनेक देव-देवी-दैवतांची मंदिरे ह्या जिल्ह्यात आहेत. मौखिक लोकवाङ्मय, परंपरा, रूढी, दंतकथा आणि आजूबाजूच्या परिसरातील समाजाच्या धर्मश्रद्धा व संकल्पना यांच्या आधारे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवतांची माहिती येथे दिली आहे.देवताविज्ञान व लोकदैवतांचा अभ्यास करणार्यांना, मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.