अरुणा ढेरे ह्या आजच्या बहुआयामी कवयित्री-लेखिकेचा हा तरल आणि समृध्द अनुभव देणारा कथासंग्रह - ‘उंच वाढलेल्या गवताखाली’. मानवी नात्यातली व्यामिश्रता चित्रित करताना अरुणा ढेरे ह्यांची लेखणी काव्यगत हळूवारपण जपते तर कथांतले निसर्गवर्णन साक्षात कविताच असते. दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणार्या या संग्रहाची अर्पणपत्रिका - ‘समजुतीपलीकडे राहिलेल्या पुष्कळ सुखदु:खांना’ - एकूणच कथांची प्रकृती अधोरेखित करण्यात समर्थ ठरते.