अप्रतिम’ जाणीव आणि नेणीव यांच्यामध्ये जो एक धूसर पट्टा असतो तिथे आसन घालून मनोहर शहाणे हा कथावंत कथानिर्मिती करीत असतो.संज्ञाप्रवाह आणि बाह्य वास्तव या उभयतांचे आकलन आणि अन्वयन त्यामुळे तो घोटीवपणे करू शकतो शहाणे यांची कथा चुस्त का आहे ते आता कळले नं? संज्ञाप्रवाहात्मक लेखन शुष्क नव्हे पण विस्कळीत होते तथ्यप्रधान लेखन विस्कळीत नव्हे पण शुष्क होते ‘उद्या’मधील कथा तशा का होत नाहीत ते आता कळले नं? ‘अर्धपुतळा’ ‘दत्तात्रय अमुक-तमुक’ ‘उद्या’ इत्यादी कथा याची प्रात्यक्षिके आहेत.
स्वभान येणे-जाणे हे तत्त्वसूत्र या कथाविश्वाखाली असूनही या कथा तत्त्वकथा होत नाहीत या कथा कुठल्याच प्रचलित पायवाटेने फिरत नाहीत. धूसर पट्टा बोलभाषा-ग्रंथभाषा छद्मी भाव यामुळे कथानुभवापासून लेखक अचूक अदूर राहतो न दूर न समीप. मनोहर शहाणे यांची कथा अनन्य आणि मौलिक आहे.