तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे? मग हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे; कारण यशाचे गुपित उलगडणारे मुद्दे तुम्हाला याच पुस्तकाच सापडतील.मुळात माणूस जशी आशा करतो तसाच बनतो. त्यामुळे आपल्या स्वत:विषयी तरी माणसाने सकारात्मक विचार करायला हवेत. स्वत:विषयी तरी माणसाने सकारात्मक विचार करायला हवेत. स्वत:बद्दल तुम्ही चारचौघांत जे काही बोलता, त्यावरूनच तुमच्या अस्तित्वाची पायाभरणी होत असते. त्यामुळे चार चौघांत स्वत:विषयी जागरूकतेनेच बोला.एखादे कार्य करताना त्यासाठी लागणारे विशिष्ट कौशल्य आपल्याला अवगत हवे. अन्यथा अडचणी निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होतो. व्यक्ती निरूत्साही बनते आणि स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेते. सोबतच अतिरिक्त कष्ट, हीन भावना, घाई सुखद झोपेचे शत्रू घेऊन येते.अशा या अविकसित जीवनात तुम्ही साहसाने सामोरे जा. श्रम आणि आराम यांच्यात समतोल साधून स्वत:च स्वत:चे मालक बना. कारण जो माणूस कधीही साहस सोडत नाही, त्याचा कधीही पराजय होत नाही आणि ईश्वरही त्याची मदत करतो. माणसाची किंमत त्याचे साहस आणि उत्साह यावरूनच गणली जाते. ज्या व्यक्तींमध्ये उत्साह आणि निर्भयता आहे, त्याची महत्ता हे जग निश्चितच मान्य करते. त्याला विशेष यशप्राप्ती होते आणि कोणतीही अडचण त्याचा मार्ग अडवू शकत नाही.अजूनही वेळ गेलेली नाही. उठा, हा मार्ग अनुसरा; कारण म्हणतात ना, ‘जागो तब सवेरा.’