पॅरिस, स्टॅलिनग्राड आणि बर्लिन दुसर्या महायुध्दातील तीन अत्यंत महत्त्वपूर्ण रणक्षेत्रे. एका विराट आंतरराष्ट्रीय संघर्षाचे भवितव्य निश्चित केले ते या भव्यभीषण लढायांनी. म्हणूनच, दुसर्या महायुध्दाच्या इतिहासात या तीन संघर्षांना अढळ स्थान प्राप्त झाले. एका बाजूला एकाकी हिटलर आणि दुसर्या बाजूला चर्चिल, स्टॅलिन आणि रुझवेल्ट यांची संयुक्त आघाडी अशा या सत्तास्पर्धेतील ही काही रक्तरंजित पाने. अवश्य वाचाव्यात एवढी रोमांचक नाट्यमयता या संघर्षकथांना खचितच लाभली आहे.