‘मोठी माणसं लहानपणीही मोठीच होती की काय? अशी शंका थोर माणसांच्या थोरपणाच्या गोष्टी ऐकताना लहान मुलांच्या मनात येते. खरंतर लहानपणी कुणीची मोठे नसते; पण मोठेपणाची बीजे मात्र लहानपणीच अंकुरतात. प्रामाणिकपणा, सेवाभाव, मातृप्रेम, सत्यनिष्ठा, मानवतर, अहिंसा, नि:स्वार्थीपणा, स्वावलंबन असे अनेक गुण लहानपणापासून अनेक थोर व्यक्तींमध्ये अंकुरलेले दिसतात.लहान मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी जगभरातील अनेक थोर पुरुषांच्या बालपणातील प्रेरक प्रसंग या पुस्तकात गोष्टीरुपाने मुलांना समजतील अशा भाषेत सांगितले आहेत.महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, साधे गुरूजी, राणी लक्ष्मीबाई, मार्टिन ल्युथर किंग, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी थोर माणसे लहानपणी कशी होती, हे वाचायला कुणाला आवडणार नाही?गोष्ट सांगतानाच मुलांवर योग्य संस्कार करणारे एक संग्राह्य पुस्तक.