तो एक सुप्रसिद्ध लेखक. - त्याची युद्धवार्ताहर असणारी पत्नी एक दिवस अचानक गायब होते. कुठलाही धागादोरा मागे न ठेवता. दिवस जात राहतात; त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येतात. प्रसिद्धीची अनेक शिखरं तो सर करतो. परंतु एवढे यश मिळूनही; तिच्या अनुपस्थितीमुळं तो कायमच अस्वस्थ राहतो. नेमकं काय घडलं असावं हा प्रश्न त्याला भंडावून सोडतो... तिचं अपहरण केलं गेलं की कुठल्याशा कारणामुळं ती अगतिक झाली होती, की केवळ या वैवाहिक आयुष्याचा तिला वीट आला होता? तिनं निर्माण केलेली ही अस्वस्थता तिच्या प्रेमाइतकीच तीव्र आहे. तो तिचा शोध घेऊ लागतो. एका अर्थाने स्वतःच्या आयुष्यातील सत्याचाच तो शोध असतो. हा प्रवास त्याला दक्षिण अमेरिकेपासून स्पेन, फ्रान्स आणि क्रोएशियापर्यंत घेऊन जातो. शेवटी तो पोचतो मध्य आशियातील सुंदर गवताळ प्रदेशात. हा प्रवास त्याला प्रेमाचे स्वरूप उलगडवून दाखवतो, दैवाचे सामर्थ्य किती आहे हे शिकवतो आणि आपल्या हृदयाच्या मार्गदर्शनाखाली प्रवास करणं म्हणजे काय हेही दाखवून देतो. द .जहीर म्हणजे पाउलो कोएलोच्या जबरदस्त शैलीचा केवळ आविष्कारच नाही तर विशाल शक्यतांच्या या जगात माणूस असणं म्हणजे काय याचा परिपाठच आहे.