दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंवरील अत्याचार म्हणजे मानवी क्रूरतेची परिसीमा. या क्रूरतेला आपली पोर बळी पडू नये म्हणून लिनच्या पालकांनी तिला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवलं. फोस्टर कुटुंबानं तिला लपवलं आणि नाझीवादापासून तिचं संरक्षणही केलं. पण कालांतरानं तिला फोस्टर कुटुंबापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतरच्या तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली. तिनं मानवी विकृतीच्या कित्येक तऱ्हा अऩुभवल्या. फोस्टर कुटुंबाचा नातू अर्थात बार्ट व्हॅन एस तिच्या या हेलावून टाकणाऱ्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता दुसऱ्या महायुद्धानं घडविलेल्या वेदनादायी विध्वंसावरही प्रकाश टाकतात.