शीला वेब एकोणीस विलब्रॅहॅम क्रेसंट इथं नक्की का आली होती? केवळ एका खून झालेल्या मध्यमवयीन माणसाचे शरीर पाहण्यासाठी? त्या घराच्या अंध मालकिणीशी, श्रीमती पेबमार्शशी तिचा परिचय नव्हता. श्रीमती पेबमार्शही शीलाच्या कार्यालयाला फोन करून तिच्याविषयी विचारणा केल्याचं साफ नाकारात होत्या; पण असं कुणीतरी केलं होतं. आणि मयताशी दोघींचाही परिचय असल्याचं काही दिसत नव्हतं. या अशा कुणालाच काहीच माहीत नसलेल्या घटनेमध्ये ते घड्याळ मात्र हर्क्युल पायरोसाठीच टीक टीक करत होतं. फक्त ज्या खोलीत खून झाला होता, तिथल्या घड्याळांच्या बाबतीत मात्र हे खरं नव्हतं. एक घड्याळ चार वाजून तेरा मिनिटाला थांबलं होतं.
‘भव्य आणि आपल्याच तेजाने उजळून निघालेली रहस्य कथा.’
न्यूयॉर्क टाईम्स