मार्क स्वे... एक अकरा वर्षांचा, काहीसा उनाड पण हुषार पोरगा अचानक एका दुष्टचक्रात गुरफटला जातो. त्याच्या डोळ्यासमोर एक आत्महत्या घडते आणि संकटांची मालिका सुरु होते. ह्या आत्महत्येमागे बरीच रहस्यं दडलेली असतात.. ‘एफबीआय’ ह्या रहस्याचे धागेदोरे जुळवू पहात असल्यामुळे मार्क त्यांचं हुकुमाचं पान ठरतं.... मार्कनं ही रहस्यं उघड करावीत म्हणून ‘एफबीआय’ची यंत्रणा हलत राहते... दुसरीकडे ह्या आत्महत्येमुळे गुन्हेगारी वर्तुळही धोक्यात येतं.... गुन्हेगारांच्या काळ्या सावल्या मार्कचा पाठलाग करत राहतात. ह्या जीवघेण्या पाठलागात मार्कला भेटते एक वकील... रेगी लव्ह... मार्क आणि रेगी आता न्याययंत्रणा हलवू लागतात आणि गुन्हेगारी जगताचा रहस्यभेद होऊ लागतो... अमेरिकन समाजाचा छेद घेत राजकारण आणि गुन्हेगारी जगतामधल्या दुव्यांना हात घालणारी मार्क स्वेची ही लढत खिळवून ठेवते.... अंंतर्मुख करते...