'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. नितीन कोताप्पले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुननांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी.