नाताळाच्या काळातलं उत्तमोत्तम अन्न पदार्थांनी सज्ज असलेलं आणि ओंडके पेटवून प्रकाशमान झालेलं तरीही शहरापासून दूर आणि शेताला लागूनच असणारं एखादं इंग्लिश घर हे गुन्ह्यासाठी अगदीच अयोग्य जागा वाटू शकते. सगळं काही अलबेल दिसत असलं तरी तसं नसल्याबद्दल हर्क्युल पायरोला सावध केलं ते त्याच्या उशीवर ठेवलेल्या सूचक चिठ्ठीनं. हा थोर गुप्तहेर अतिशय सावधपणे पावलं टाकायला लागतो; पण जेव्हा एका तरुण स्त्रीचं पांढर्या कपड्यात गुंडाळलेलं आणि त्यावर असणार्या लाल डागाच्या मधोमध कुर्दीश खंजीर खुपसलेलं प्रेत बर्फात सापडलं तेव्हा पायरोला आपली सगळी बुद्धिमत्ता गतीमान करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
अशा सात घटनांमधून हर्क्युल पायरो आणि जेन मार्पल त्यांची थक्क करून सोडणारी शोध घेण्याची शक्ती दाखवून देतात.
‘गुन्हेगारी कादंबर्यांची सम्राज्ञीच!’
- सण्डे एक्सप्रेस