फाईव्ह पॉइंट समवन` आणि `वन नाईट @ द कॉल सेंटर` यानंतरची चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतली ही कादंबरी वाचकांना त्या विश्वात नेऊन खिळवून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळं ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्यापुढचे प्रश्न, सद्यपरिस्थिती यांचा वेध घेतानाच; बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांची सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते.