ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणा-या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुस-याच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?