प्रस्तुत पुस्तकाचे लेखन प्रा. म. वि. दिवेकर हे संगमनेर महाविद्यालयात संगमनेर येथे 1992 पासून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर्पांविषयी विशेष प्रेम असलेले प्रा. दिवेकर हे ‘सर्पमित्र’ म्हणून ओळखले जातात. सर्प-संवर्धनाचे काम लोकशिक्षणातून करीत असतानाच सर्पदंशावरील उपचारासाठी ते डॉक्टारांनाही सहकार्य करीत असतात. अशा प्रा. म. वि. दिवेकरांनी विविध मासिकांतून सातत्याने विज्ञानलेखनही केले आहे. नव्या दमाच्या व विलक्षण ताकदीच्या त्यांच्या कथांचा हा संग्रह वाचकांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल यात शंका नाही.