श्री. वि. स. खांडेकरांच्या तीन साहित्यविषयक व्याख्यांनाचा हा संग्रह आहे. या व्याख्यानांचे वैशिष्ट्य असे की, यांपैकी फक्त एकच श्रोत्यांनी एकलेले आहे आणि उरलेली दोन व्यासपीठावर न झाल्यामुळे रातल्या घरात केलेली आहेत. प्रत्यक्षात ही न झालेली व्याख्याने उज्जैन आणि मिरज येथील नियोजित संमेलनांसाठी आधीच लिहून सिद्ध ठेवलेली होती; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उज्जैनला जाता आले नाही आणि मिरजेचे संमेलनच रद्द झाले. वरवर पाहता ही व्याख्याने असली, तरी श्री. खांडेकरांनी त्या काळच्या मराठी ललित वाडंमयाचे आत्मनिरीक्षणात्मक परीक्षण करून, त्यातील उणिवा जाणकार साहित्यप्रेमींपुढे धीटपणे मांडलेल्या आहेत. या तीनही व्यख्यानांतून व्यक्त झालेले चिंतनगर्भ विचार आजच्या मराठी साहित्याच्या वाचकाला निश्चितच अंतर्मुख करतील.