गोतम बुद्धाचं जीवनचरित्र म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत, बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास आणि बुद्ध झाल्यानंतरचा प्रवास...या प्रवासातील त्याचं सुरुवातीचं राजस जीवन...त्याच्या पित्याने म्हणजे शुद्धोदन महाराजांनी त्याला वैराग्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना न जुमानता पुत्रजन्मानंतर काही तासांतच त्याने केलेला गृहत्याग...गृहत्यागानंतरची त्याची भ्रमंती आणि त्यादरम्यान अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी त्याची चाललेली धडपड...त्यानंतर अंतिम सत्याचा त्याला झालेला साक्षात्कार...त्यातूनच बौद्ध धम्माची, भिक्खू संघाची झालेली स्थापना...देश-परदेशात त्याचा झालेला प्रसार...प्रवृत्ती आणि निवृत्तीतील संघर्षाचं...बुद्धांच्या जीवनातील अनेक नाट्यमय प्रसंगांचं, बौद्ध धम्माच्या प्रकाशाचं, तत्त्वज्ञानाचं कथारूपी, तपशीलवार दर्शन घडविणारी महाकादंबरी