‘नचिकेताचे उपाख्यान’ आणि ‘श्रावणसोहळा’ या अनेक पुरस्कारप्राप्त कादंबर्यांचे लेखक आणि समकालीन साहित्याचे समीक्षक संजय भास्कर जोशी यांचे कथा क्षेत्रातले हे दमदार पाऊल.
कथा लिहिता लिहिताच जोशी निर्मितीची सर्जनशील प्रक्रियाच तपासून पाहतात. यातल्या ‘स्वप्नस्थ’, ‘वाल्याच्या बायकोचा नवरा’, ‘शेवटची गोळी’, ‘जादूगार’ यांसारख्या कथा कथालेखनाच्या नवनव्या शक्यता आजमावतात आणि आशयगर्भ प्रयोगशील आविष्काराने वाचकाला चकित करतात. एका यशस्वी कादंबरीकाराने गंभीरपणे कथेची वाट चालावी याचे स्वागत करायला हवे. . .