शास्त्री : वहिनीसाहेब, श्रीमंत गेले आणि मराठी दौलतीचा कणाच मोडला. पानिपताचा घाव यापुढे काहीच नाही. अवघ्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत बलाढ्य शत्रूंचं पारिपत्य करून पेशवाईचं कर्ज निवारणारा, पानिपताचा कलंक धुऊन काढणारा असा प्रजादक्ष पेशवा परत मिळणं कठीण! रमा : स्वारींना फार काळ तिष्ठत ठेवणं बरं नाही. आम्ही मंदिरात येऊ. चिंतामणीच्या साक्षीनं आम्ही स्वारींच्या मागून जाऊ. ‘स्वामी’ या अजरामर साहित्यकृतीचे नाट्यरूपांतर!