विविध जैविक रसायने, संप्रेरके, एन्झाइम, न्युरो-ट्रान्समीटर, इम्युनोग्लोब्यूलीन यांसारख्या शरीराला गरज असणाऱ्या सर्व औषधी घटकांची निर्मिती करणारा कारखाना प्रत्येकाच्या शरीरात जन्मतःच असतो. जेव्हा आपल्या भावनेत, समजुतीत आपण जाणीवपूर्वक बदल करतो, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा आजारपण म्हणजे काय याचे नीट आकलन होते. संपूर्ण निरोगीपणाची नैर्सिगक स्थिती कशी आणि का असते, हे समजायला लागते. आपल्या आतला डॉक्टर एकदम भानावर येतो आणि निरोगीपणा व स्वास्थ्याची स्थिती लवकरात लवकर यावी, सुसंवाद साधला जावा म्हणून सर्व सुधारणांना शरीर-मनाच्या पातळीवर ताबडतोब सुरुवात होते. स्वतःमधल्या प्रवासाचा टप्प्याटप्प्यानं अनुभव घेता यावा व स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे संपूर्णपणे परतता यावे, हे ‘कॉन्शसनेस हील्स’ या पुस्तकामागचे प्रयोजन आहे.