मी आणि अशोक नायगावकर यांनी मिळून हास्यरंगाचे
प्राथमिक स्वरूप ठरविण्यापासून तर तिला सर्वसमावेशक विनोदाचे व्यासपीठ करण्यापर्यंतचे केलेले प्रयत्न हा माझ्या पत्रकारितेच्या आजवरच्या कारकिर्दीतला अत्यंत आनंददायी प्रवास होता. ‘हास्यरंगाचे अंक एकत्र बाईंड करून ठेवलेले आहेत,
ते कधीही वाचले तरी शिळे वाटत नाहीत,’ असं सांगणारे
अनेक वाचक आजही भेटतात, तेव्हा त्या श्रमाचे चीज
झाल्यासारखे वाटते. हास्यरंग घडविण्याच्या प्रक्रियेत
आम्ही सतत नवीन लेखकांच्या शोधात होतो.
ज्योती कपिले यांचा शोधही आम्हाला त्याच प्रक्रियेत लागला.
अनुवाद करण्यासाठी कथांची निवड करताना
मराठी वाचकांच्या भावविश्वाची ओळख असणं आवश्यक होतं,
ते कपिले यांना चांगलंच साधलं आहे. सूर्यबाला यांचा कौटुंबिक विनोद आणि जोशी यांची राजकीय ङ्गटकेबाजी यांचा तोल सांभाळताना कपिले यांना विनोदाची नाडी चांगलीच सापडली. त्यांचे हे सगळे लेखन एकत्र वाचताना, त्यांची खुमारी आणि ताजेपणा आजही कायम असल्याचे लक्षात येते.
संदर्भ बदलले तरी बहुश: मध्यमवर्गीय समाजाच्या
सामाजिक-राजकीय जाणिवा ङ्गार बदललेल्या नाहीत,
त्यामुुळे त्यातला विनोद-उपहास आजही लागू होतो.
श्रीकांत बोजेवार