यासर अराफतच्या निवडक तुकडीतला नेमबाज जवान. पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी शिर तळहातावर घेऊन लढणारा. माणसं टिपणं, हत्या करणं, चकमकी, लढाईची धुमश्चक्री हेच त्याचं आयुष्य बनलेलं. अचानक एक दिवस त्याच्या कानी पडली येशूची मानवतावादी शिकवण आणि मनात रुजलं करुणेचं रोपटं. हिंसेच्या, रक्तपाताच्या रस्त्यानं चालणारी पावलं आता सलोख्याच्या, शांततेच्या, मैत्रीच्या अन् समन्वयाच्या वाटेनं चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणा-या या अवघड प्रवासाची सत्यकथा.