का महत्त्वाचा आहे, चित्रकला जगतात १८५७ ते १९५० हा काळ? काय आहे बॉम्बे स्कूल कलापरंपरा ? या काळाच्या आणि या परंपरेच्या पार्श्वभूमीवर सादर करत आहोत, आजवर अपरिचित असलेल्या पाच स्त्री चित्रकार! अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल गोडबोले, मारी हेंडरसन, मग्दा नाख्मन त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि चित्रकला कर्तृत्वाचा हा शोध आणि बोध! प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी फारफार भिन्न, त्यांचे चित्रविषय निरनिराळे, त्यांची वाटचाल वेगवेगळी! पण त्यांची आंतरिक उर्मी समान – चित्रे काढणे! चित्रसृष्टीच्या कॅनव्हासवर, त्यांच्याही रंगरेषांचं, आहे एक स्थान! या सर्वांचा वेध घेतला आहे, कलासमीक्षक साधना बहुळकर यांनी!
स्त्री चित्रकार