स्त्रीचं आपल्या एकूणच सामाजिक - सांस्कृतिक पटावरचं स्थान कोणतं आहे? ते तसं का आहे? जेव्हा कधी तिच्या अस्मितेशी निगडित असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा सर्वसाधारण समाजाची त्या प्रश्नांबद्दलची प्रतिक्रिया काय असते? संस्कृतीच्या वाटचालीत स्त्रीच्या कर्तृत्वाचा वाटा काय असतो? श्रेय काय असतं? ते तिला दिलं जातं का? स्त्री कशामुळे कोलमडते किंवा कशामुळे ताठ उभी राहून संघर्षाची तयारी करते? त्या संघर्षाचे फळ आणि परिणाम यांच्या मर्यादांचा विचार समाज कधी सजगपणे करतो का? या आणि अशा कित्येक प्रश्नांशी भिडणार्या लहान मोठ्या निमित्तांनी या पुस्तकातलं लेखन झालेलं आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात सांस्कृतिक पॆस धांडोळण्याचा हा एक मुक्त प्रयत्न आहे.