एखादी महिला पोलिसांकडे जाते तेव्हा तिला प्रथम पोलिसांची भीती वाटत असते. अनेक वेळा गुन्हा घडलेला नसतो, पण तो घडण्याची भीती तिच्या मनात असते. अशा वेळी तो गुन्हा दखलपात्र आहे अथवा नाही; तसेच एखाघा व्यक्तीकडून भविष्यात काही गुन्हा घडण्याची शक्यता असेल तर कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. अनेक वेळा हा पेच पोलिसांना सामंजस्याने सोडवावा लागतो. कारण तिचे कुटुंब मोडणार नाही वा तिला इतर कोणता आधार आहे का, याचाही विचार करावा लागतो. थोडक्यात, ज्या विश्वासाने ती स्त्री पोलिसांकडे आली आहे, त्या विश्वासाला न्याय घावा लागतो. अशा वेळी पोलिसांना मार्गदर्शक ठरेल अशी काही माहिती या पुस्तकात आहे. पोलिसांना त्वरित हाताशी संदर्भ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.